नोटबंदी - दुर्बल अर्थव्यवस्थेवरील अनावश्यक ‘सर्जिकल स्ट्राईक’!
प्रश्न हा आहे की, शस्त्रक्रिया गुप्त रहावी म्हणून ज्या मोजक्या शल्यचिकित्सकांशीच फक्त सल्लामसलत झाली, ते पुरेसे तज्ज्ञ होते का? किंवा त्यांच्यापैकी कुणी वेगळे काही मत दिले असेल, तर त्यांचे ऐकले गेले असेल का? काही काळ हे अजून गुपितच राहील. सरकारने खरे तर नोटबंदीचे अपयश मोठ्या मनाने स्वीकारायला हवे होते. नोटबंदीच्या अपयशामुळे मोदींचे काहीही बिघडणार नाही. त्यांनी आधीच कथन बदललेय.......